Monday, May 28, 2007

गारवा ... बेवड्यांचा !!!

Original

गीतकार : सौमित्र
Album : गारवा

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

विडंबन

ग्लासभर दारु खिडकीत उभं राहून ढोसुन पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारा बियरचा फेस चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, गुत्त्यावर ये
तो भरलेला असेलच, टेबलावर हात ठेवुन बसुन रहा
खुर्ची सरकेल बुडाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग पिऊ लाग, दारुचे अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा संपेपर्यत, तो संपणार नाहिच, शेवटी घरी ये
चड्डी बदलू नकोस, ग्लास पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता बेवड्यांची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली बाटली घे, ओपनर तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या झिंगण्याचं कारण, तू म्हणं ज्युस संपलंय
मग चिअर्स कर, तूही घे
तो उठून हिमेश रेशमिया लावेल, तो तू बंद कर
किशोरचं शराबी लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला बिल देईल, म्हणेल तू मला देणं लागतोस
पण तुही तसचं म्हणं
मोबाईलचा थरथराट होईल, तो घराकडे रवाना होईल
तो त्या गटारात पडेल, त्याच्या माखलेल्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी रस्त्ता पहायला विसरू नकोस
यानंतर दारुड्यांचा आवाज नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली बाटली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या गटारीला एक क्षणतरी, बघ माझी आठवण येते का?

6 comments:

Sudhakar......... said...

ha ha ha ....
Jabardast..

Yogesh said...

jabari

Meghana Bhuskute said...

मस्त!
तुला माहितेय, ही मला फार आवडणारी कविता सौमित्रची. तिचं विडंबन ऐकून पूर्वी मला बेक्कार राग येत असे लहान मुलासारखा! पण इतकी विडंबनं होणारी कविता किती मोठी असेल, अशी समजूत आता पटते!
विडंबन मस्तच!

~ŶΘĞĔšĤ~ said...

ThanQ All..

मेघना,
Actually मला ही कविता अजिबात आवडत नाही त्यामुळे मी त्यावर हे विडंबन केलं.. असो.. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे कविता "मोठ्ठी" ;) आहे जरुर.. मराठीत type करता करता घाम निघाला... हा हा हा

Unknown said...

Sahi...............

Unknown said...

Sahi...............