Thursday, March 29, 2007

इथे सखे नि सोबती.. कुणी इथे कुणी तिथे !

आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची.

कुणी लहानपणी भेटले, कुणी आत्ता आत्ता... कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली, कुणी मैफ़िलींत भेटली. कुणी प्रवासात भेटले, कुणी शेजारी म्हणून लाभले.कुणी जवळ आले, कुणी खेचुन जवळ घेतले...काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली...

काहींच्या वेवलेंथस पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या... काहींनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला...

प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये.

माझेही 'गणगोत' फार मोठे आहे...

~योगेश~